राज्यातल्या विविध महाविद्यालयात तासिका तत्त्वावर शिकवणाऱ्या अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या अध्यापकांना आता ताशी १ हजार रुपये मानधन मिळेल. अनुभवी आणि उद्योग क्षेत्रातल्या तज्ञांची नवी श्रेणी सरकारनं सुरू केली असून त्यांना ताशी पंधराशे रुपये माणळेल, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
सहायक प्राध्यापक, प्राचार्य, शारीरिक शिक्षण संचालक आणि ग्रंथपालांच्या भरतीलाही वित्त विभागाची मान्यता मिळाली आहे. त्यानुसार २ हजार ८८ सहायक प्राध्यापकांची आणि उर्वरित २२३ पदांची भरती केली जाणार असल्याचं ते म्हणाले. (AIR NEWS)