A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

तिघांची लढत, जोरदार भिडत, वसंत मोरे यांची एंट्री होताच रवींद्र धंगेकर म्हणाले, मी…

News

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची तारीख आता अवघ्या काही दिवसांनवर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर होत आहे. महाराष्ट्रातही वंचित बहुजन आघाडीने नव्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली असून पुण्यातील उमेदवाराचंही नाव जाहीर करण्यात आलं आहे. मनसेला सोडचिठ्ठी देणारे नेते वसंत मोरे यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. तर पुण्यात काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी आधीच जाहीर झाली आहे. भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांचं नावही आधीच जाहीर झालं आहे. त्यामुळे पुण्यात आता तिहेरी लढत पहायला मिळणार आहे. वंचितकडून वसंत मोरे यांचं नाव जाहीर झाल्यावर धंगेकर यांनी प्रतिक्रिया देत मोरे यांना एक खास सल्ला दिला आहे. ‘डोकं शांत ठेवा ‘ ठेवा असा सल्ला धंगेकरांनी मोरेंना दिला आहे.

काय म्हणाले रविंद्र धंगेकर ?

ही निवडणूक पुणेकर लढणार आणि पुणेकरच जिंकणार आहेत. लोकशाहीमध्ये कोणीही कुठूनही निवडणूक लढू शकतो, तो ज्याचा त्याचा संविधानिक अधिकार आहे. जो उमेदवार लोकशाहीसाठी लढेल, लोक त्यालाच मतदान करतील. वचिंत बहुजन आघाडीने वसंत मोरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. वसंत मोरे अनेक पक्षातील नेत्यांना आणि लोकांना भेटले . ते कोणत्याही पक्षात गेले तरी ते निवडणूक लढवणारच होते. डोकं शांत ठेवा, असाच सल्ला मी त्यांना देईन, असे रविंद्र धंगेकर म्हणाले.

10 Days ago