दशकातलं महत्त्वपुर्ण आणि शेवटचं खग्रास सूर्य ग्रहण आज सकाळी देशातल्या बहुतांश भागात दिसणार

News

देशाच्या अनेक भागात आज होणारं खग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. चंद्राची सावली सूर्याच्या मध्यभागी पडणार असल्यामुळे सूर्याच्या कडेबाहेर वलय दिसेल. फक्त केरळमधे कन्नूर इथं सूर्याभोवतीचं पूर्ण वलय बघता येईल. देशाच्या इतर भागात ते दिसणार नाही. दिल्लीत सकाळी ८ वाजून १७ मिनिटांनी ग्रहणाला सुरुवात होईल आणि ते १० वाजून ५६ मिनिटांनी संपेल. सकाळी साडेनऊ वाजता सूर्य सर्वाधिक झाकला जाईल.

देशात अनेक ठिकाणी टेलिस्कोप आणि विशेष दुर्बिणींच्या सहाय्यानं ग्रहण बघण्याची व्यवस्था केली आहे. ग्रहण काळात देश आणि परदेशातून भाविक कुरुक्षेत्र इथंल्या ब्रम्हसरोवरात स्नान करायला येणार आहेत. या दशकातलं हे शेवटचं सूर्यग्रहण आहे. भारताबरोबरच पाकिस्तान, सौदी अरेबिया, कतार, यूएई, ओमान, श्रीलंका, मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर, उत्तर मरिना बेटं आणि गुआम इथं हे ग्रहण दिसणार आहे. (AIR NEWS)

63 Days ago