आपकी जीत में ही हमारी जीत है
Promote your Business

दाक्षिणात्य अभिनेत्री विजयालक्ष्मीचा आत्महत्येचा प्रयत्न

news

राजकीय नेत्यांनी त्रास दिल्याचा आरोप

चेन्नई (वृत्तसंस्था) : दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री विजयालक्ष्मी हिने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मानसिक तणावामधून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला असून, सुदैवाने तिला वाचवण्यात यश आल्याचे वृत्त आहे. विजयालक्ष्मी हिने सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पोस्ट केले होते. त्यामध्ये तिने आपल्याला खूप त्रास देण्यात येत असल्याने आपण तणावात असल्याचे म्हटले होते. दरम्यान, रविवारी तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून मी ब्लड प्रेशरच्या काही औषधांचे सेवन केले असून, त्यामुळे आता रक्तदाब कमी होत जाऊन माझा मृत्यू होईल, असा दावा केला होता. मात्र तिला वाचवण्यात आले असून, सध्या चेन्नईमधील एका रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.

आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी तिने एक व्हिडीओ फेसबूकवर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ती म्हणते की, हा माझा शेवटचा व्हिडिओ आहे. मी गेल्या चार महिन्यांपासून सिमान आणि त्याच्या पार्टीच्या लोकांमुळे खूप तणावात आहे. मी माझ्या कुटुंबासाठी जिवंत राहण्याचा प्रयत्न केला. मात्र तसे होताना दिसत नाही आहे. मला हरी नाडर याने प्रसारमाध्यमांमधून खूप अपमानित केले आहे. मी आता ब्लड प्रेशरच्या गोळ्यांचे सेवन केले आहे. काही वेळाने माझा ब्लड प्रेशर कमी होऊन माझा मृ्त्यू होईल.

दरम्यान, माझा मृत्यू हा लोकांसाठी उदारहरण ठरावा, तसेच सीमान आणि हरी नाडरसारख्या लोकांना सोडण्यात येऊ नये, असे आवाहन तिने चाहत्यांना केले. तसेच आपले मानसिक शोषण केल्याप्रकरणी या लोकांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली. विजयालक्ष्मीवर सध्या चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सीमान हा तमिळ नॅशनलिस्ट पक्षाचा नेता आहे. हरी नाडर हा सुद्धा एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे.

(PRAHAAR)

65 Days ago

Download Our Free App

Advertise Here