आपकी जीत में ही हमारी जीत है
Promote your Business

दिल्लीच्या तणावग्रस्त भागात पुरेसा बंदोबस्त असून स्थिती नियंत्रणात - अमित शहा

News

दिल्लीतल्या तणावग्रस्त भागात पुरेसा बंदोबस्त असून स्थिती नियंत्रणात असल्याचं केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी काल सांगितलं. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या मुद्यावरुन इशान्य दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारानंतर सद्यस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीत दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, वरीष्ठ अधिकारी, तसंच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ही परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वानी राजकीय मतभेद बाजूला ठेवून पुढं यावं. अफवा पसरवून जनतेत निर्माण केलं जाणारं भय दूर करण्यासाठी पोलीस करत असलेल्या प्रयत्नांना सहकार्य करावं, असं आवाहन शहा यांनी केलं. (AIR NEWS)

33 Days ago

Download Our Free App