देशातील डेंग्यूच्या स्थितीचा आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या तयारीचा आढावा केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी काल नवी दिल्ली इथं घेतला. देशभरात डेंग्यूची रुग्ण संख्या अलिकडे वाढल्यानंतर त्याला प्रतिबंध आणि त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी काय व्यवस्था आहे, त्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. डेंग्यूला रोखण्यासाठी केंद्र सरकारनं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं राज्यांनी सक्तीनं पालन करावं असं सागून मांडवीय म्हणाले की यासाठी केंद्रानं राज्याला पुरेसा निधी पुरवला आहे. (AIR NEWS)