A part of Indiaonline network empowering local businesses

देशाच्या विकासात ख्रिश्चन आणि मुस्लिम समुदायाचं योगदान मोठं - केंद्रीय मंत्री जॉन बार्ला

News

देशाच्या विकासात ख्रिश्चन आणि मुस्लिम समुदायाचं योगदान मोठं असून २०४७ पर्यंत देशाला विकसित आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी या समुदायाने आणखी पुढं येण्याची गरज असल्याचं केंद्रीय अल्पसंख्यांक राज्यमंत्री जॉन बार्ला यांनी म्हटलं आहे. राज्यमंत्री बार्ला आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आले असताना त्यांनी मुस्लिम आणि ख्रिश्चन समुदायाच्या प्रमुख नेत्यांशी संवाद साधला. अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी केंद्रानं अनेक योजना आणल्या असून दोन्ही समाजातल्या गरिबांपर्यंत या योजना पोचवण्यासाठी नेत्यांनी प्रयत्न करावेत, असं आवाहन जॉन बार्ला यांनी यावेळी केलं. (AIR NEWS)

20 Days ago