देशात गेल्या २४ तासात कोविडसंसर्ग झालेले एक हजार ८३९ नवे रुग्ण आढळले, तर तीन हजार ८६१ रुग्ण बरे झाले.
काल दिवसभरात ११ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशात सध्या २५ हजार १७८ रुग्णांवर उपचार सुरु असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ७६ शतांश टक्के इतका झाला आहे. (AIR NEWS)