A part of Indiaonline network empowering local businesses

देशात यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीपेक्षा कमी ९४ टक्के पाऊस होण्याची शक्यता 'स्कायमेट' संस्थेक

News

देशात यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा कमी म्हणजे सुमारे ९४ टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाज, 'स्कायमेट' या खाजगी संस्थेने व्यक्त केला आहे. स्कायमेटच्या मान्सूनबद्दलच्या प्राथमिक अंदाजानुसार, देशात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सरासरी ८५८ पूर्णांक सहा मिलीमीटर पाऊस राहण्याची शक्यता आहे. गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात, जुलै आणि ऑगस्ट या मुख्य महिन्यांत कमी पावसाचा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभाग आपला अंदाज १५ एप्रिलला प्रसिद्ध करणार आहे. मे महिन्याच्या शेवटी देखील भारतीय हवामान विभागाचा एक अंदाज येतो, त्यानंतर यंदा पावसाबाबत स्थिती अधिक स्पष्ट होईल. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात आज तर बीड जिल्ह्यात पुढचे दोन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या सूचनेनुसार या काळात जोरदार वारे, विजांचा कडकडाट तसंच मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (AIR NEWS)

51 Days ago