यंदाच्या मान्सूनमध्ये देशात १ जूनपासून पडलेला पाऊस सुमारे ७ टक्के कमी आहे. गेल्या महिन्यात ५ टक्के अतिरिक्त पाऊस झाला होता मात्र ऑगस्टमध्ये दीर्घ काळ कमजोर राहिल्यानं ही तूट दिसत असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय या राज्यांमध्ये उद्यापर्यंत जोरदार पाऊस सुरू राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मैदानी भागात पुढचा आठवडाभर कमी स्वरुपात पाऊस सुरु राहिल असा अंदाज आहे. हवामान विभागाच्या विस्तारित अंदाजात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बदल होऊ शकतो. (AIR NEWS)