नायजेरियाच्या किना-याजवळ सागरी चाच्यांनी अपहरण केलेल्या 18 भारतीय नागरिकांची सुटका

news

नायजेरियाच्या किना-याजवळ हॉगकॉगच्या मालकीच्या जहाजावरुन सागरी चाच्यांकडून अपहरण झालेल्या 18 भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. 3 डिसेंबरला नेवृ कॉस्टेलेशन या व्यापारी जहाजावरुन अपहरण झालेल्या 18 भारतीयांची सुटका झाल्याच्या वृत्ताला नायजेरियातल्या भारतीय उच्चायुक्तालयानं ट्विटद्वारे दुजोरा दिला आहे.

तसंच त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्नशील राहिलेल्या नायजेरियाचा नौदल विभाग तसंच नौवहन कंपनीचे आभार मानले आहेत. (AIR NEWS)

56 Days ago