Promote your Business

निर्भया प्रकरणी : HC निर्णयाला आव्हान देणार्‍या केंद्रसरकारच्या याचिकेची सुनावणी SC घेणार

news

निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या केंद्रसरकारच्या याचिकेची सुनावणी सर्वोच्च न्यायालय आज घेणार आहे.

याप्रकरणी दोषी ठरलेल्या चार आरोपींची फाशीची शिक्षा अंमलात आणायला कनिष्ठ न्यायालयानं स्थगिती दिली होती, त्याविरोधात केंद्रसरकारनं दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळली.

त्याविरुद्ध केंद्रसरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणातल्या आरोपींच्या फेरविचार याचिका याआधीच फेटाळण्यात आल्या आहेत, असं केंद्र सरकारची बाजू मांडताना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल के. एम. नटराज यांनी काल न्यायालयाला सांगितलं. (AIR NEWS)

54 Days ago

Download Our Free App