न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं सुरु असलेल्या एटीपी एएसबी कलासिक टेनिस स्पर्धेत भारताचा दिविज शरण

news

न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं सुरु असलेल्या एटीपी एएसबी कलासिक टेनिस स्पर्धेत भारताचा दिविज शरण आणि न्यूझिलंडचा आर्टेम सितक या जोडीनं अव्वल मानांकित जॉन पिअर्स आणि मायकल विनस या जोडीला ७-६, ७-६ असं चुरशीच्या झुजींत पराभूत केलं, आणि स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

या जोडीचा सामना सॅडर गिल आणि जोरान विगेन या जोडीशी होणार आहे. भारताच्या रोहन बोपण्णा आणि फिनलंडच्या हेन्री कोन्टीनन या जोडीनंही स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. (AIR NEWS)

42 Days ago