A part of Indiaonline network empowering local businesses Chaitra Navratri

न्यूझीलंडला गॅब्रिएल चक्रीवादळाचा फटका, देशात आणीबाणी जाहीर

News

न्यूझीलंडच्या नॉर्थ आयलंड भागाला गॅब्रिएल चक्रीवादळाचा फटका बसल्यानं न्यूझीलंडमध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. ही परिस्थिती अभूतपूर्व आणि अनपेक्षित आहे आणि नॉर्थ आयलंडच्या बहुतांश भागाला याची झळ पोचली आहे, अशी माहिती आणीबाणी व्यवस्थापन मंत्री कीरन मॅकॅनल्टी यांनी दिली. प्रचंड पूर, रस्त्यांची आणि इतर पायाभूत सुविधांची दुरवस्था यामुळे न्यूझीलंडच्या नागरिकांसाठी हे प्राणघातक संकट आहे, असंही त्यांनी सांगितलं.

मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे देशभरातल्या ३८ हजार घरांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. पूर परिस्थिती आणि दरडी यामुळे न्यूझीलंडचं सर्वात मोठं शहर असलेल्या ऑकलंडच्या आसपासच्या काही भागांसह देशभरातल्या अनेक भागांचा संपर्क तुटला आहे.२०१९ चा ख्राइस्टचर्चवरचा हल्ला आणि २०२० चं कोरोनाचं संकट यानंतर न्यूझीलंडनं आणीबाणी करण्याची ही तिसरी वेळ आहे. (AIR NEWS)

40 Days ago