आपकी जीत में ही हमारी जीत है
Promote your Business

न्यूझीलंडविरुद्ध भारताचा क्रिकेट सामना वेलिंग्टन इथं सुरु

News

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला कसोटी क्रिकेट सामना आज पहाटे वेलिंग्टन इथं सुरु झाला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यानं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं.

कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारताच्या फलंदाजीला खिंडार पाडलं. त्यांनी उपाहाराआधीच भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ, भरवशाचा चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहलीला स्वस्तात तंबूत धाडलं.

शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या ५ बाद १२१ धावा झाल्या होत्या. (AIR NEWS)

37 Days ago

Download Our Free App