परभणी जिल्ह्यात नदीपात्रात वाळू माफियांना पडकण्यासाठी गेलेले डिग्रस सज्जाचे तलाठी सुभाष होळ नदीपात्रात बुडाल्याची गटना काल घडली. जिंतूर तालुक्यातल्या मौजे डिग्री इथं, नदीपात्राच्या दुसऱ्या किनाऱ्यावर वाळूमाफिया ट्रॅक्टरमध्ये वाळू भरत असल्याचं होळ यांच्या निदर्शनास आलं, त्यांना पकडण्यासाठी ते पाण्यातून पोहत जात असताना ते नदीपात्रात अचानक बेपत्ता झाले. काल संध्याकाळपर्यंत त्यांचा शोध लागला नसल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. (AIR NEWS)