परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर आज जकार्ताला पोचले. ते इंडोनेशिया आणि थायलंडच्या औपचारिक भेटीवर गेले आहेत. तिथं पोचल्यावर जयशंकर यांनी आसियानचे संचालकीय सचीव डॉ. काऊ कीम हौर्न यांची भेट घेतली. भारत - आसियानच्या धोरणात्मक भागिदारीवर या दोघांनी चर्चा केली. वित्त, सायबर आणि सागरी क्षेत्रासंबधी चर्चेवर जयशंकर यांचा भर होता. ऊर्जा, आपत्ती व्यवस्थापन आरोग्य आणि कल्याण या विषयांवरही दोघांनी विस्तृत चर्चा केली. भारत - आसियान भागिदारीची दुसऱ्या स्तारावरील व्याप्ती आणखी वाढवण्यावर दोघांंचं एकमत झालं. जयशंकर यांनी व्हिएतनामचे परराष्ट्र व्यवहारमंत्री बुई थान यांच्याबरोबर देखील व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा हवाई मार्ग वाढवण्यावर चर्चा केली. मलेशियाचे परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. झांब्री अब्दूल कादीर यांच्याबरोबर दोन्ही देशांच्या व्यापार वाढीबरोबरंच आसियानशी संबंधीत मुद्द्यांवरही संवाद साधला. जयशंकर उद्या आसियान देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. (AIR NEWS)