पुणेकरांना मिळकत करात मिळणारी 40 टक्के सवलत कायम राहणार असून तीन पट शास्ती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात काल बैठक घेतली; या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
पुणे महापालिकेकडून मिळकत करात 40 टक्के, तर देखभाल- दुरुस्तीमध्ये 15 टक्क्यांची सवलत दिली जात होती. मात्र, 2018 मध्ये देखभाल-दुरुस्तीतील पाच टक्क्यांची आणि मिळकत करात 40 टक्के सवलत राज्य सरकारने रद्द केली.
त्यामुळे पुणेकरांच्या मिळकत करात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे मिळकत करातील 40 टक्क्यांची सवलत कायम ठेवावी, अशी मागणी नागरिकांनी केली होती. पुण्याच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करून या प्रश्नाकडे लक्ष वेधलं होतं. (AIR NEWS)