पौष्टिक तृणधान्याविषयीच्या जागतिक श्री अन्न परिषदेचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी 11 वाजता नवी दिल्लीमध्ये होणार आहे. पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित एका टपाल तिकीटाचं आणि नाण्याचं अनावरणही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात ते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.
भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या तृणधान्य संशोधन केंद्रांमधील उत्कृष्ट केंद्राची घोषणा तसंच पौष्टिक तृणधान्याविषयीच्या ध्वनी चित्रफितीचं अनावरणही यावेळी केलं जाईल. या परिषदेला सहा देशांचे कृषी मंत्री, आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ, पोषणतज्ञ, आरोग्य तज्ज्ञ, स्टार्टअप नेते आणि अन्य संबंधित प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. 100हून अधिक देशांचे प्रतिनिधी या कार्यक्रमामध्ये दूरदृश्य पद्धतीने सहभागी होणार आहेत. (AIR NEWS)