आपकी जीत में ही हमारी जीत है
Promote your Business

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेला १ वर्ष पूर्ण

News

प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेला आज १ वर्ष पूर्ण झालं. गेल्यावर्षी उत्तर प्रदेशातल्या गोरखपूर इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या योजनांचा शुभारंभ केला होता.

या योजनांनुसार वर्षाला एकूण सहा हजार रुपये तीन टप्प्यामधे शेतकर्‍यांच्या थेट खात्यात जमा होतात. आतापर्यंत सुमारे आठ कोटी ४६ लाखांहून अधिक शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

यामधे महाराष्ट्रातले ८४ लाख ५९ हजार शेतकरी आहेत. यासाठी केंद्रसरकारनं आतापर्यंत ५० हजार ८५० कोटी रुपये दिले आहेत. (AIR NEWS)

35 Days ago

Download Our Free App