प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुलअझीझ अल सौद यांच्याशी फोनवरून संवाद साधला. द्विपक्षीय सहकार्य आणि परस्पर हिताच्या विविध बहुपक्षीय आणि जागतिक मुद्द्यांवर या दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. संघर्षग्रस्त सुदानमधून भारतीयांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी सौदी अरेबियानं केलेल्या सहकार्याबद्दल मोदी यांनी मोहम्मद बिन सलमान यांचे आभार मानले, तसंच हज यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. भारताच्या जी-२० अध्यक्षतेच्या काळात भारतानं हाती घेतलेल्या विविध उपक्रमांना मोहम्मद बिन सलमान यांनी पूर्ण पाठिंबा दर्शवला, तसंच त्यांच्या आगामी भारतभेटीबद्दल उत्सुक असल्याचंही नमूद केलं. (AIR NEWS)