प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी आज अमेरिकेच्या अध्यक्षांच्या निवासस्थानी म्हणजेच व्हाईट हाऊसमधे स्वागत समारंभ सुरु आहे. मोदी यांचं व्हाईट हाऊसमधे आगमन झाल्यावर त्यांना २१ तोफांची सलामी देण्यात आली. अमेरिका दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या सोबत चर्चा करतील. त्यानंतर अमेरिकन संसदेच्या दोन्हा सभागृहांच्या संयुक्त बैठकीला ते संबोधित करतील. हा मान दुसऱ्यांदा मिळवणारे ते पहिलेच भारतीय प्रधानमंत्री आहेत. यापूर्वी २०१६ मधे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण अमेरिकन संसदेत झालं होतं. दोन वेळा हा मान जगातल्या फक्त ३ राष्ट्र प्रमुखांना मिळाला आहे. त्यानंतर आज संध्याकाळी प्रधानमंत्र्यांच्या सन्मानार्थ स्नेह भोजनाचं आयोजन करण्यात आलं असून, त्यावेळी ते अमेरिकेतले लोकप्रतिनिधी, मुत्सद्दी आणि इतर मान्यवरांशी अनौपचारिक चर्चा करतील. (AIR NEWS)