A part of Indiaonline network empowering local businesses

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आज प्रधानमंत्री मोदींसह जयपूर भेटीवर

News

प्रजासत्ताक दिन सोहोळ्याचे प्रमुख पाहुणे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आज जयपूरला भेट देणार आहेत.प्रधानमंत्री नरेंद्र मोदीही आज जयपूरला येणार आहेत.मॅक्रॉन गुलाबी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपूरमधील अंबर किल्ला,जंतरमंतर आणि हवा महल या ऐतिहासिक स्थळांना भेट देणार आहेत.अंबर किल्ल्यावर मॅक्रॉन यांच्यासाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.त्यानंतर ते जागतिक वारसा स्थळ असलेल्या जंतरमंतर इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. दोन्ही नेते हवा महल इथं एका संयुक्त फेरीमध्ये भाग घेतील.ते अल्बर्ट हॉललाही भेट देणार आहेत.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मॅक्रॉन यांच्यासाठी विशेष रात्रीभोजनाचेही आयोजन केलं आहे. (AIR NEWS)

35 Days ago