आपकी जीत में ही हमारी जीत है
Promote your Business

बँक ग्राहकांच्या सोयीकरता ईज-थ्री पॉइंट झीरो प्रणालीचा प्रारंभ

News

बँक ग्राहकांच्या सोयीकरता स्मार्ट आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सज्ज अशा ईज-थ्री पॉइंट झीरो प्रणालीचा प्रारंभ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल केला. यावेळी बोलताना, बँकांच्या थकित कर्जांच्या वसुलीसाठी कठोर पावलं उचलण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

ग्राहकांना नीट समजावं यासाठी बँक कर्मचार्‍यांनी त्यांच्याशी त्यांच्या भाषेत संवाद साधला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. सरकारला बँकिंग क्षेत्रात डाटा विश्लेषणाचा उपयोग करण्याची इच्छा आहे, असंही त्यांनी सांगितलं. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमधे अनेक अधिका-यांना सरकारी योजनांची पुरेशी माहिती नसते. याकडे त्यांनी लक्ष वेधलं. (AIR NEWS)

32 Days ago

Download Our Free App