A part of Indiaonline network empowering local businesses

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी आजपासून अर्ज दाखल करता येणार

news

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी आजपासून अर्ज दाखल करता येतील. ज्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षा द्यायची आहे किंवा श्रेणीसुधार योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे, त्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीनं अर्ज भरता येतील. याशिवाय ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांची पडताळणी करायची आहे, त्यांना येत्या पाच जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल. पुनर्मूल्यांकनासाठी आवश्यक उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळवण्याकरता १४ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना पाच जून रोजी दुपारी तीन वाजता संबंधीत कनिष्ठ महाविद्यालयातून गुणपत्रिका वितरित होणार आहे. तर जुलै-ऑगस्ट मध्ये विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा घेतली जाईल. (AIR NEWS)

123 Days ago