कौला लुंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या पी व्ही सिंधू, किदंबी श्रीकांत आणि एच एस प्रणॉयनं स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सिंधुनं जपानच्या अया ओहोरीला २१-१६, २१-११ असं नमवलं. पुरुष एकेरीच्या स्पर्धेत किदंबीनं आठव्या मानांकित थायलंडच्या कुनलाऊत विटीड्समला २१-१९, २१-१९ असं पराभूत केलं. प्रणॉयनं ऑल इंग्लंड स्पर्धेचा विजेता, चीनचा ली शी फेंगला १३-२१, २१-१६, २१ - ११ नं नमवलं. या स्पर्धेतल्या कामगिरीवर स्पर्धकांचं पॅरिस इथं होणाऱ्य़ा ऑलंपिक स्पर्धेतलं स्थान निश्चित होणार आहे. (AIR NEWS)