आपकी जीत में ही हमारी जीत है
Promote your Business

बेस्टच्या प्रवासी संख्येत वाढ

News

मुंबई : बेस्ट उपक्रमाने प्रवासी भाडय़ात कपात केल्यानंतर मुंबईकरांकडून बेस्टला पसंती दिली जात आहे. त्यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यानुसार गेल्या सात महिन्यांत दररोज सरासरी १३ लाख ७७ हजार प्रवाशांची भर पडली. प्रवासी संख्या वाढली हे खरे असले तरी दुसरीकडे मात्र महसुलात प्रति दिन सरासरी ५४ लाखांची घट झाली आहे.

बेस्टने ९ जुलै २०१९ पासून भाडेकपात केली. सध्या बेस्ट पाच किलोमीटरच्या साध्या प्रवासाकरिता पाच रुपये आणि वातानुकूलित प्रवासासाठी सहा रुपये भाडेआकारणी करते आहे. यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत वाढ झाली. भाडेकपातीआधी दररोज सरासरी १९ लाख २३ हजार प्रवासी बेस्टने प्रवास करत होते. हीच संख्या भाडेकपातीनंतर जानेवारी २०२० पर्यंत सरासरी २९ लाख ५ हजारापर्यंत गेली.

फेब्रुवारी महिन्यात पॉइंट टू पॉइंट सेवेमुळे त्यात आणखी भर पडली आहे. आता दररोज सरासरी ३३ लाख प्रवासी बेस्टने प्रवास करत आहेत. वांद्रे, सांताक्रूझ, देवनार, शिवाजीनगर, घाटकोपर, मुलुंड आगारांतर्गत सुटणा-या बसगाडय़ांना चांगला प्रतिसाद प्रवाशांकडून मिळत आहे.

प्रवासी वाढले असले तरी बेस्टच्या महसुलावर परिणाम झाला आहे. भाडेकपातीपूर्वी बेस्टला दररोज सरासरी २ कोटी ३६ लाख १६ हजार रुपये महसूल मिळत होता. हाच महसूल सरासरी १ कोटी ८२ लाख ११ हजार रुपयांवर आला आहे. बेस्टला दररोजच्या सरासरी ५४ लाख रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे.

(PRAHAAR)

36 Days ago

Download Our Free App