A part of Indiaonline network empowering local businesses Chaitra Navratri

बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट स्पर्धेतला अंतिम सामना अनिर्णित

News

बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट स्पर्धेचा अहमदाबाद इथला सामना आज अनिर्णित राहिल्यानं करंडक भारतानेच राखला आहे. चार सामन्यांच्या मालिकेतला हा चौथा सामना होता. पहिले दोन सामने भारताने तर तिसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता.ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 480 तर भारताच्या 571 धावा झाल्या होत्या. पाहुण्या संघाच्या दुसऱ्या डावात दोन गडी बाद 175 धावा झाल्या असताना सामना संपला.

विराट कोहलीला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळाला तर पूर्ण मालिकेतल्या सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान आर आश्विन आणि रविंद्र जाडेजा यांना मिळाला.दरम्यान जागतिक कसोटी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाबरोबर भारताचाही प्रवेश निश्चित झाला आहे. (AIR NEWS)

12 Days ago