आपकी जीत में ही हमारी जीत है
Promote your Business

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची आत्महत्या

news

मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तो ३४ वर्षांचा होता. छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करत त्याने करिअरला सुरुवात केली होती. २०१३ मध्ये ‘काइ पो चे; या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा पुरस्कारदेखील मिळाला होता. त्याच्या आत्महत्येच्या बातमीने बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे.


सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असे म्हटले जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. २००९ मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो घरघरांत पोहोचला. त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले.


बिहारमधील पाटणा येथे त्याचा जन्म झाला. त्याने दिल्लीमधून इंजिनिअरिंग पूर्ण केले. छोट्या पडद्यापासून सुरु झालेला त्याचा प्रवास अगदी हेवा वाटेल असाच आहे. काही दिवसांपूर्वीच सुशांतची माजी मॅनेजर दिशा सालियन हिने आत्महत्या केली होती. सुशांतच्या आत्महत्येच्या वृत्ताने संपूर्ण कलाविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.


सुशांत एक लोकप्रिय अभिनेता होता. फार कमी वेळात त्याने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. ‘किस देश में हे मेरा दिल’ ही त्याची छोट्या पडद्यावरील पहिली मालिका होती. यानंतर एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत सुशांतला संधी मिळाली आणि या एका संधीने त्याचे आयुष्य बदलले. या मालिकेने सुशांतला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. या मालिकेनंतर सुशांत बॉलिवूडकडे वळला होता.
‘काय पो छे’ या सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. बॉलिवूडमध्ये त्याला खरी ओळख दिली ती ‘एम एस धोनी-अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमाने. या सिनेमात त्याने भारताचा माजी क्रिकेट कर्णधार एम. एस. धोनीची भूमिका साकारली होती. त्याने धोनीची भूमिका पडद्यावर अशी काही जिवंत केली की, या सिनेमाने इतिहास रचला. हा सुशांतचा पहिला सुपरडुपर हिट सिनेमा होता. या चित्रपटानंतर ‘केदारनाथ’ या सिनेमात तो सारा अली खानसोबत दिसला होता. सोनचिडीया, छिछोरे या सिनेमातही त्याने काम केले.

अंतहीन स्वप्ने आणि क्षणभंगूर जीवन…! आईसाठी लिहिलेली शेवटची भावूक पोस्ट
मृत्यूला कवटाळण्यापूर्वी सुशांतने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. ही पोस्ट त्याच्या आईसाठी होती. आईच्या आठवणीने सुशांत व्याकूळ झाला होता, हे ही पोस्ट वाचल्यानंतर कळते. ३ जूनला शेअर केलेल्या या पोस्टमध्ये सुशांतने आईचा फोटो लावला आहे. ‘अश्रूंनी अस्पष्ट होत चाललेला भूतकाळ… अंतहीन स्वप्ने आणि क्षणभंगूर जीवन दोघांमध्ये वाटाघाटी सुरु आहेत… आई,’ असे कॅप्शन त्याने या पोस्टला दिले होते. आईसाठी लिहिलेली सुशांतची ही पोस्ट बरेच काही सांगणारी आहे. सुशांत १६ वर्षांचा असताना त्याच्या आईचे निधन झाले होते. सुशांत आईच्या जवळ होता. अनेकदा सुशांतने आईच्या आठवणीत पोस्ट शेअर केल्या होत्या. सुशांत गेल्या काही महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये होता असे कळते.

माजी मॅनेजर दिशाच्या आत्महत्येच्या
वृत्ताने हादरला होता सुशांत

सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनने काही दिवसांपूर्वी मुंबईतील मालाड येथील एका इमारतीवरून उडी मारुन आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले होते. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. तिच्या आत्महत्येनंतर सुशांतने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर दिशाला श्रद्धांजली देखील वाहिली होती. त्यानंतर आता अभिनेता सुशांत सिंग राजपूतने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले. त्याच्या आत्महत्येचे वृत्त वाचून बॉलिवूडमधील कलाकारांना व त्याच्या चाहत्यांना खूप धक्का बसला आहे. अद्याप सुशांतने हे टोकाचे पाऊल का उचलले, हे समजू शकलेले नाही.

पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली
सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केल्यानंतर सा-यांनाच धक्का बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्याला ट्विटच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. सुशांत सिंग राजपूत – एक अतिशय प्रतिभावान, उमद्या आणि तरूण अभिनेत्याने खूप लवकर जगाचा निरोप घेतला. टिव्ही मालिका आणि चित्रपटांतील त्याचा अभिनय खूप चांगला होता. मनोरंजन जगतात त्याने स्वत:च्या परिश्रमाने नाव मिळवलं. तो खूप जणांसाठी प्रेरणास्थान होता. तो अनेक आठवणी मागे ठेऊन गेला आहे. त्याच्या मृत्यूच्या वृत्ताने मला धक्का बसला आहे. मी त्याच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. ओम शांती, असे ट्विट करत पंतप्रधान मोदी यांनी त्याला श्रद्धांजली वाहिली.

‘छिछोरे’मध्ये आत्महत्या न करण्याचा
संदेश दिला अन् स्वत:च आत्महत्या केली…

काही महिन्यांपूर्वी सुशांतचा ‘छिछोरे’ हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात आत्महत्या करणे आयुष्यावरचा तोडगा नाही, असा संदेश सुशांतने दिला होता. आत्महत्या न करण्याचा संदेश देणाऱ्या याच सुशांतने आज आत्महत्या करत जीवन संपवले, हा एक दुर्दैवी योगायोग म्हणावा. सात मित्रांच्या कॉलेज लाईफवर आधारित ‘छिछोरे’ या सिनेमात सुशांतने अनिरूद्ध उर्फ अन्नीची भूमिका साकारली होती. कॉलेजात या सातही मित्रांना लुजर्स ठरवण्यात आले असते. पण हे सातही मित्र जिद्दीने लुजर्सचा हा टॅग हटवतात, असे या चित्रपटाचे ढोबळ कथानक होते. अन्नीचा मुलगा आत्महत्येचा प्रयत्न करतो तेव्हा अन्नी आपल्या सात मित्रांच्या मदतीने पुन्हा एकदा आपल्या कॉलेज लाईफमधील आठवणी ताज्या करत, आपल्या मुलात जगण्याची नवी उमेद जागवतो. मुलाला मृत्यूच्या दाढेतून परत आणतो. आयुष्यात कितीही संकटे आलीत, कितीही अपयश आले तरी खचून न जाता त्याचा धीराने आणि चिकाटीने सामना करायचा, हा संदेश या चित्रपटातून देण्यात आला होता. सुशांत सिंगने लोकांना हा संदेश दिला खरा. पण स्वत: मात्र त्याने हा संदेश अंमलात आणला नाही, असेच म्हणावे लागेल.

(PRAHAAR)

59 Days ago

Download Our Free App

Advertise Here