केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल नौदलाच्या अद्ययावतीकरणाचा स्वदेशी कार्यक्रम स्वावलंबन दोन याचा आरंभ केला. नौदलात नवोन्मेष आणि स्वदेशीकरण संघटनेच्या नवी दिल्लीतील 'स्वावलंबन' या चर्चासत्रात या कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यापासून स्वावलंबनाला सर्वोच्च प्राधान्य देत आहे. देशाला संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं यावेळी राजनाथ सिंह यांनी सांगितलं. सरकारच्या धोरणांमुळं देश आता संशोधन आणि विकासात वेगानं पुढं जात आहे, असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी स्वदेशी बनावटीच्या 98 नव्या वस्तूंची पाचवी यादीही प्रसिद्ध केली. (AIR NEWS)