भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या 50 षटकांच्या तीन क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतीला पहिला सामना आज मुंबईतल्या वानखेडे मैदानावर होणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्या भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेत 2 -1 नं विजय मिळवल्यानंतर या मालिकेचीही दमदार सुरुवात करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे. (AIR NEWS)