A part of Indiaonline network empowering local businesses

भारत डेमोग्राफिक डिव्हिडंड मार्गक्रमण करत असून सरकार त्याचा अधिकाधिक वापर करण्याच्या दिशेनं प्रयत्न

news

भारत सध्या डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजेच लोकसंख्याशास्त्रीय लाभांशामधून मार्गक्रमण करत आहे आणि सरकार त्याचा अधिकाधिक वापर करण्याच्या दिशेनं प्रयत्न करत आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्लीतल्या सीआयआयच्या वार्षिक बैठकीत बोलत होते. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुशासन वाढवण्यासाठी सरकारनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. भारतात व्यवसाय करणं आणि राहणीमानात केंद्र सरकारनं सुलभता आणली आहे,असं त्यांनी सांगितलं. कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम संगणक प्रणाली आणि अनुवंशशास्त्राच्या सहाय्यानं आज नवे मार्ग खुले होत असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतानं तंत्रज्ञानात आघाडीवर राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसंच देशात एक लाख स्टार्ट अप्स आहेत, त्यापैकी शंभरहून अधिक युनिकॉर्न जन्माला आले आहेत, असं राजनाथ सिंग यांनी सांगितलं. (AIR NEWS)

280 Days ago