मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नांदेड जिल्ह्यात दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात काल यासंदर्भात उपसमितीची बैठक घेण्यात आली. ३१ मार्च आणि एक एप्रिलला हे कार्यक्रम होणार आहेत. मराठवाडा मुक्ती संग्रामात नांदेड जिल्ह्याचं योगदान हे अपूर्व आहे.
यात उमरी इथला लढा, कल्लाळी इथला संघर्ष, नांदेडचा झेंडा सत्याग्रह, ताडी झाडासाठी प्रातिनिधीक आंदोलन, या सर्व प्रत्येक घटना मराठवाड्याच्या मुक्तीसाठी मोलाचा टप्पा ठरलेल्या आहेत. या योगदानाला अधोरेखित करण्यासह हुतात्म्यां प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण जिल्हा पुढे सरसावेल असा विश्वास खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यावेळी व्यक्त केला. (AIR NEWS)