मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही देत सगळ्यांना विश्वासात घेऊनच राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात ही लढाई लढेल आणि जिंकेल असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानपरिषदेत व्यक्त केला.
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत, ओबीसी समाजाच्या सवलती मराठा समाजाला देण्यात येतील, मात्र हे करताना ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही; त्यांच्या सवलती कमी होणार नाहीत याची काळजी घेण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. (AIR NEWS)