महाराष्ट्रात वर्षभरानंतर पुन्हा एकदा कोविड संसर्ग वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबईतल्या काही खासगी रूग्णालयांनी कोविड १९ चे स्वतंत्र विभाग पुन्हा सुरू केले असून, दर दिवशी काही बाधित रूग्णांना दाखल करून घेतले जात आहे.
कोविड रूग्णवाढीच्या पार्श्वभुमीवर काही रूग्णालयांमध्ये मुखपट्टी वापरणे तसेच चाचण्यांसंदर्भातले नियम लागू केले आहेत. रविवारी, महाराष्ट्रात कोविड १९ च्या ३९७ नव्या रूग्णांची नोंद झाली. राज्यात ऑक्टोबरपासून प्रथमच उपचाराधीन कोविड रूग्णांची संख्या २ हजाराच्या वर गेली आहे.
मुंबईमध्ये नव्या १२० कोविड रूग्णांची नोंद झाली असून. १७ नवे रूग्ण रुग्णालयांमध्ये दाखल झाले आहेत.सध्या मुंबईमध्ये ४३ कोविडबाधित रूग्ण विविध रुग्णालयात दाखल असून त्यापैकी २१ रूग्णांना प्राणवायू दिला जात आहे. (AIR NEWS)