A part of Indiaonline network empowering local businesses

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाचा निर्णय न्यायालयात होईल - देवेंद्र फडणवीस

news

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाचा निर्णय न्यायालयात होईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेलेला आहे. दोन्ही राज्य न्यायालयापुढे आपल्या भूमिका मांडत आहेत.

दरम्यान, राज्य सरकारनं समन्वयासाठी नियुक्त केलेल्या दोन मंत्र्यांचा उद्याचा बेळगाव दौरा रद्द करण्यात आला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई हे उद्या बेळगावला जाणार होते. कर्नाटकात आंदोलन होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा दौरा रद्द करण्यात आला आहे. (AIR NEWS)

446 Days ago