महाराष्ट्र पोलिसांतर्फे १ फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे आयोजन

news

महाराष्ट्र पोलिसांतर्फे येत्या १ फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आयोजित केली आहे. सर्व वयोगटातल्या नागरिकांना आपले आरोग्य टिकवण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून महाराष्ट्र पोलिस दलाच्या स्थापना दिनाचं औचित्य साधून गेट वे ऑफ इंडिया ते वांद्रे सी लिंक अशी ही दौड होईल.

२ फेब्रुवारीला ३०० सायकलपटू वेगवेगळ्या टिकाणांहुन कुलाब्याच्या पोलिस महासंचालक मुख्यालयापर्यंत सायकलफेरी काढण्यात येईल, असं महाराष्ट्र पोलिसांनी सांगितलं आहे. (AIR NEWS)

42 Days ago