महिला प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत गुजरात जायंट्सनं काल रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला 11 धावांनी पराभूत केलं. गुजरात जायंट्सच्या स्नेह राणानं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. या संघानं सात बाद 201 धावा केल्या.
हरलीन देओलनं 67, तर सोफिया डंकलीनं 65 धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा संघ वीस षटकांमध्ये 6 बाद 190 धावाच करू शकला. या संघाच्या सोफी डिव्हाईननं 66 धावा केल्या. गुजरात जायंट्सच्या ऍश्ले जायंट्सनं तीन गडी बाद केले. (AIR NEWS)