A part of Indiaonline network empowering local businesses Chaitra Navratri

मुंबईत विविध ठिकाणी दहशतवादी हल्ले घडवण्याची राष्ट्रीय तपास संस्थेला धमकी

news

राष्ट्रीय तपास संस्थेला एका अज्ञात व्यक्तीनं ईमेलद्वारे मुंबई शहरात विविध ठिकाणी दहशतवादी हल्ले घडवून आणण्याची धमकी दिल्यामुळे शहरातली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. एनआयए, मुंबई पोलिसांची गुन्हे अन्वेषण शाखा आणि महाराष्ट्राचं दहशतवाद-विरोधी पथक संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करत आहे.

गुरुवारी सकाळी एनआयएच्या मुंबई कार्यालयाला अज्ञात व्यक्तीकडून ही ई-मेल मिळाली होती त्यानंतर लगेचच मुंबई शहरातल्या ९५ पोलिस स्थानकांतील दहशतवादविरोधी पथकांना सतर्कता वाढवण्याच्या आणि संशयास्पद हालचाली किंवा व्यक्ति आढळल्यास कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं. सुरक्षा यंत्रणा इंटरनेट प्रोटोकॉल (IP) एड्रेसच्या आधारे ही धमकी कुठून पाठवण्यात आली असावी याचा शोध घेत आहेत. (AIR NEWS)

50 Days ago