मुंबईसह जगभरात नववर्षाचं उत्साहात स्वागत

News

जगभरात लोकांनी नव्या वर्षाचं उत्साहात स्वागत केलं आणि सरत्या वर्षाला निरोप दिला. मुंबईसह देशभरातही नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं गेलं. मुंबईकरांनी रात्री बाराच्या ठोक्याला ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करून २०१९ चं स्वागत केलं आणि सरत्या वर्षाला निरोप दिला.

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी लोक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडले होते. विशेषतः तरुणांचा उत्साह ओसांडून वाहत होता. अनेक ठिकाणी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी संगीत आणि नृत्याच्या कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं. (AIR NEWS)

47 Days ago