आपकी जीत में ही हमारी जीत है
Promote your Business

मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’चा टोल १ एप्रिलपासून महागणार

news

मुंबई : मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’चा टोल महाग होणार आहे. १ एप्रिलपासून नवे दर लागू होणार आहेत. महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एमएसआरडीसी)ने हा निर्णय घेतला आहे. तसेच या टोलसाठी नव्या कंत्राटदाराचीही नियुक्ती करण्यात आली आहे. कारसाठी सध्या २३० रुपये मोजावे लागतात. १ एप्रिलपासून २७० रुपये मोजावे लागणार आहेत.

मिनी बससाठी सध्या ३५५ रुपये टोल आकारला जातो. आता हा टोल ४२० रुपये होणार आहे. बससाठी सध्या ६७५ रुपये टोल आकारला जातो. तो टोल ७९७ रुपये होणार आहे. ट्रक टू अ‍ॅक्सलसाठी ४९३ रुपये टोल आकारला जातो. हा टोल ५८० रुपये होणार आहे. क्रेन किंवा तत्सम अवजड वाहने आणि टू अ‍ॅक्सलपेक्षा जास्त क्षमता असलेल्या वाहनांना सध्या १५५५ रुपये टोल आकारला जातो. हा टोल १ एप्रिलपासून १८३५ रुपये इतका आकारला जाईल.

पुढील १५ वर्षासाठी मुंबई पुणे एक्स्प्रेस वेचा वापर करण्यासाठी टोल आकारला जाणार आहे. दर तीन वर्षानी एक्स्प्रेस वेवरील टोलच्या दरात १८ टक्के वाढ होईल, अशी अधिसूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने २००४ मध्येच काढली होती.

(PRAHAAR)

33 Days ago

Download Our Free App