A part of Indiaonline network empowering local businesses Chaitra Navratri

युवावर्ग देशाच्या विकासाचं, तर भारत जगाच्या विकासाचं इंजिन आहे - प्रधानमंत्री

news

केवळ भारतच आपल्या तरुणांकडे आशेने पाहतो असं नाही तर संपूर्ण जग भारताच्या तरुणांकडे आशेनं पाहत असून तुम्ही भारताच्या विकासाचे इंजिन आहात. आणि भारत हे जगाच्या विकासाचे इंजिन आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज चेन्नई इथं अण्णा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात बोलत होते.

आजचा दिवस केवळ यशाचाच नाही, तर आकांक्षांचाही आहे. आमच्या तरुणांची सर्व स्वप्ने पूर्ण व्हावीत, अशी माझी इच्छा आहे. शिक्षक आणि इतर कर्मचार्‍यांसाठी, तुम्ही राष्ट्रनिर्माते आहात, जे उद्याचे नेते घडवत आहात, असंही प्रधानमंत्र्यांनी सांगितल. ते पुढं म्हणाले की पुढचा २५ वर्षाचा काळ भारतासाठी अमृत काळ असून, नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे विद्यार्थ्यांना निर्णय घेण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले. गेल्या सहा वर्षात, भारतातल्या स्टार्टअपमधे १५ हजार टक्क्यांची वृद्धी झाली आहे, आणि ८३ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त एफडीआय भारतात आल्याचं त्यांनी सांगितलं. (AIR NEWS)

241 Days ago