A part of Indiaonline network empowering local businesses Chaitra Navratri

युवा-20 कृतीगटाच्या तीन दिवसांच्या बैठकीला आजपासून गुवाहाटी इथं प्रारंभ

News

भारताच्या जी 20 देशांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीतील उपक्रमांच्या अतर्गत येणाऱ्या युवा 20 कृतीगटाची पहिली बैठक आज आसाममध्ये गुवाहाटी इथं होणार आहे. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या शिखर परिषदेत देशातील विद्यार्थ्यांना प्रथमच जगभरातील प्रेक्षकांसमोर आपली मते मांडण्याची संधी मिळणार आहे.

तीन दिवस चालणारी ही परिषद आणि बैठक आय आय टी गुवाहाटीच्या परिसरात होत असल्याचं क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. जी 20 देशांमधील दीडशेहून अधिक युवक यांमध्ये सहभागी होत आहेत. महाविद्यालय आणि विद्यापीठांमधील बारा हजारांहून अधिक युवक यामध्ये सहभागी होणार आहेत. युवकांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी युवा 20 कृतीगटाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध होणार आहे, असं मंत्रालयानं म्हटलं आहे. (AIR NEWS)

48 Days ago