रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात काल दिवसभरात युक्रेनमध्ये किमान 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर 10 जण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी पाश्चात्य शस्त्रास्त्रांची मागणी केली. पुरेशा शस्त्रास्त्रांच्या जोरावरच रशियाच्या आक्रमकतेला उत्तर द्यायला हवं, असं प्रतिपादन त्यांनी आपल्या दैनंदिन संबोधनात केलं.
रशियानं डागलेली 55 पैकी बहुतांश क्षेपणास्त्रं निकामी करण्याचं श्रेय त्यांनी पाश्चात्य देशांकडून मिळालेल्या हवाई संरक्षण यंत्रणांना दिलं. झेलेन्स्की यांनी आता आपलं लक्ष पूर्वेकडच्या डोनबास भागावर केंद्रित केलं आहे. इथं संघर्ष गंभीर आहे आणि युक्रेनला मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. (AIR NEWS)