A part of Indiaonline network empowering local businesses

राज्यातील सरकारी शाळांच्या गणवेशाबद्दल संभ्रम

News

यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून संपूर्ण राज्यातील सरकारी शाळांमधून एक राज्य एक गणवेश हे धोरण अंमलात आणलं जाणार आहे; मात्र संबंधित शाळांना आपला जुना गणवेश आठवड्यातले पहिले ३ दिवस वापरण्यास अनुमती असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केलं असल्याने; आता गणवेशाबद्दलचा संभ्रम अधिकच वाढला आहे. नव्या शैक्षणिक वर्षात आता विद्यार्थ्यांना दोन गणवेश परिधान करावे लागणार असल्याचं यातून स्पष्ट झालं आहे. आठवड्यातील पहिले तीन दिवस संबंधित शाळेचा जुना गणवेश आणि उर्वरित तीन दिवस राज्य शासनानं ठरवून दिलेला नवा गणवेश वापरावा लागणार असल्यानं पालकांनाही दोन गणवेशांचा भुर्दंड बसण्याची शक्यता असल्याचं आमच्या वार्ताहरानं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. (AIR NEWS)

122 Days ago