राज्यात काल कोविडच्या १३ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर नऊ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक १८ शतांश, तर मृत्यूदर एक पूर्णांक ८१ शतांश टक्के आहे. सध्या राज्यात ७९ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी सर्वात २७ रुग्ण मुंबईत, तर २२ रुग्ण ठाण्यात असून त्याखालोखाल पुण्यात २१ रुग्ण आहेत. रायगड आणि सांगली जिल्ह्यात प्रत्येकी दोन, तर कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नांदेड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमधे प्रत्येकी एक रुग्ण उपचार घेत आहे. इतर जिल्ह्यांमधे सध्या कोविडचा एकही सक्रीय रुग्ण नाही. (AIR NEWS)