राज्यात कोविड १९ च्या रुग्णांची संख्या कमी होत असून उपचाराधीन रुग्णांची संख्या आता अडीच हजाराच्या खाली आली आहे. राज्यात काल कोविड १९ च्या ३६१ नव्या रुग्णांची नोंद झाली, ७४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर चार रुग्णांचा मृत्यू झाला.
राज्यात आत्तापर्यंत ८१ लाख ६६ हजार ८६७ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आत्तापर्यंत ८० लाख १५ हजार ८६० रुग्ण बरे झाले तर १ लाख ४८ हजार ५३२ रुग्ण दगावले. सध्या राज्यात २ हजार ४७५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक १५ शतांश टक्के, तर मृत्यूदर १ पूर्णांक ८१ शतांश टक्के आहे. (AIR NEWS)