राज्यात आज गौरी पूजनाचा उत्साह आहे. घरोघरी गौरी किंवा महालक्ष्मी रुपातल्या देवी शक्तीची पूजा करण्यात आली. सार्वजनिक गणेशोत्सवात विविध नाविन्यपूर्ण संदेश देण्यात येत आहेत. धाराशिव शहरातल्या एकता फाउंडेशन गणेशोत्सव मंडळांन यावर्षी पर्यावरण पूरक गणेश उत्सव देखावा उभारला आहे. यासाठी या गणेश मंडळांन बांबूच्या काड्या पासून बाप्पा साठी घर तयार केलं असून रेन वॉटर हार्वेस्टिंग मॉडेल देखील तयार केलं आहे . धाराशिव जिल्ह्यात दर दोन-तीन वर्षांनी उद्भवणाऱ्या दुष्काळ आणि पाणीटंचाईसारख्या समस्येवर मात करण्यासाठी नागरिकांनी पाणी बचतीचे महत्त्व लक्षात घेऊन रेन वॉटर हार्वेस्टिंग ला प्राधान्य द्यावं हा संदेश या देखाव्यातून दिला आहे. (AIR NEWS)