A part of Indiaonline network empowering local businesses

राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण

News

एकोणसत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालं.चित्रपट सृष्टीतला प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहेमान यांना प्रदान करण्यात आला.रॉकेट्री : द नंबी इफेक्ट” हा यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला.“गोदावरी” या मराठी चित्रपटासाठी निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अल्लू अर्जुन यांना “पुष्पा :द राईझ” या सिनेमातल्या भूमिकेसाठी मिळाला.“गंगूबाई काठियावाडी” करता आलिया भट आणि “मिमी” चित्रपटाकरता कृती सनोन यांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार पल्लवी जोशी यांना तर सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार पंकज त्रिपाठी यांना प्रदान करण्यात आला.सलील कुलकर्णी दिग्दर्शित “एकदा काय झालं” हा यंदाचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला.माहिती आणि प्रसारण विभागाचे मंत्री अनुराग ठाकूर आणि राज्यमंत्री डॉ.एल मुरुगन तसंच सचिव अपूर्व चंद्र कार्यक्रमाला उपस्थित होते. (AIR NEWS)

134 Days ago