A part of Indiaonline network empowering local businesses

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सर्बिया दौऱ्याची सांगता होणार

News

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सर्बिया दौऱ्याची आज सांगता होणार आहे. त्यांनी काल सर्बियाची राजधानी बेलग्रेड इथं त्यांचे सर्बियाचे समपदस्थ अलेक्झांडर वुचिच यांच्याशी द्विपक्षीय व्यापारावर चर्चा केली. दोन्ही देशांदरम्यानचा व्यापार या दशक अखेरपर्यंत सध्याच्या ३२० मिलियन युरोजवरून १ बिलियन युरोजवर नेण्यास दोन्ही नेत्यांनी मान्यता दिली. द्रौपदी मुर्मू सध्या तीन दिवसांच्या सर्बियाच्या दौऱ्यावर आहेत. त्यापूर्वी झालेल्या प्रतिनिधीमंडळ स्तरीय चर्चेदरम्यान दोन्ही देशांनी विविध क्षेत्रात सहकार्य करण्यासही मंजुरी दिली. सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वुचिच यांनी भारतीयांना व्हिजा देण्याच्या प्रक्रियेचं सुलभीकरण करण्याचं वचन दिलं. भारत-सर्बियादरम्यानची थेट विमानसेवा लवकरच सुरू होईल आणि यामुळे पर्यटन आणि व्यवसायाला चालना मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. (AIR NEWS)

112 Days ago